लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारूचे अवैध धंदे चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या, हातभट्टी दारू जनसामान्यांच्या आरोग्य धोक्यात घालत असून त्यामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आहेत, सदर प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सदर हातभट्टीवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, यांनी पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली स पो नी गोडसे व त्यांच्या तपास पथकाची एक टीम तयार करत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वाहने लांब सोडून सुमारे 2 किलोमीटर चालत जाऊन भावडी गावच्या हद्दीत हांडगर वस्ती जवळ इंद्रायणी नदीच्या पात्रात चालू असलेल्या हातभट्टी दारू भट्टीवर छापा टाकला,
