पंढरपूर येथे श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने यावर्षी आषाढी एकादशी शुभ दिनानिमित्त श्री संताजी महाराज जगनाडे या सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजन शुभारंभ ह.भ.प. परमपुज्य शांती ब्रम्ह वैराग्यमूर्ती मारुतीबाबा कुऱ्हेकर,भगवताचार्य परमपूज्य श्री.रामकृष्ण महाराज शास्त्री(आळंदी) यांच्या शुभ हस्ते पार पडले.हे श्री संताजी महाराज जगनाडे सांस्कृतिक भवन पंढरपूर येथे कैकाडी मठाजवळ,रेल्वे लाईनजवळ,प्रजापिता ब्रह्मकुमारी शेजारी उभारण्यात येत आहे.याचे आयोजन व नियोजन श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचे अध्यक्ष नारायण क्षीरसागर, श्री संताजी महाराज जगनाडे यांचे सुदुंबरे संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे,पालखी सोहळ्याचे सचिव अरविंद रत्नपारखी,सुदुंबरे संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर हाडके,पालखी सोहळ्याचे खजिनदार मनोहर जाधव,पालखी सोहळ्याचे सदस्य ताराचंद देवराय,सदस्य शंकर काळे,सदस्य हभप कोंडीबा दिवेकर,सदस्य लक्ष्मण शेलार,सदस्य विश्वास डोंगरे,तसेच सुदुंबरे संस्थेचे सदस्य अरुण काळे,सदस्य वनारसीबाई राऊत,सदस्य हभप बाळासाहेब वाळुंजकर,सदस्य उल्हास वालझाडे,सदस्य प्रदिप वाव्हाळ,सदस्य जयश्री राऊत,सर्व दिंडी प्रमुख ह.भ.प श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
