बी.जे.एस विद्यालयात ढोल-ताशाच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर गुलाबपुष्पवृष्टीसह ११ वीच्या नवागतांचे भव्य जल्लोषात स्वागत
सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) येथील बी.जे.एस विद्यालयाच्या प्रांगणात आज उत्साह ओसंडून वाहत होता. ढोल-ताश्यांच्या तालावर थिरकणारे पाऊल, लेझीमच्या ठेक्यांवर नृत्यरत विद्यार्थी आणि ‘Welcome Wish Wall’वरील प्रेरणादायी संदेशांनी विद्यालय हर्षाने उजळले.
११ वीच्या नवागतांचे हे स्वागत उत्साहाने भरले होते.प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे,प्राचार्य संतोष भंडारी,उपप्राचार्य गेठे पी.पी. व पर्यवेक्षक पांडुरंग पवार सांस्कृतिक प्रमुख नीलिमा ब्रह्मेचा यांच्या हस्ते ‘Wish Wall’चे उद्घाटन व सरस्वती पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य गेठे पी.पी. यांनी केले. प्रीती डूबे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘Wish Wall’ प्रमुख आकर्षण ठरली. कुंजीर अर्चना यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.
या निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेत चि. आर्यन लोणकर प्रथम क्रमांक मिळविला. ११ वीच्या शाखा निहाय सर्वोत्तम गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्पाने सत्कार करण्यात आला.
१२ वी कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनींच्या लेझीमने कार्यक्रमाला रंगत दिली. १२ वीच्या चि.आदित्य शर्मा व कु.मिनाक्षी मंजुळे या विद्यार्थ्यांनी मनोगते सादर केली.तसेच ११ वी च्या कु.सिध्दी शिर्के या विद्यार्थिनीने उस्फूर्तपणे आपला आनंद मनोगतातून व्यक्त केला.
चि. आदेश कापसे यांचे रांगोळीचे सादरीकरण विशेष लक्षवेधी ठरले.पर्यवेक्षक पांडुरंग पवार, देवडकर व्ही.एस्, शरद खाडे व सिंह पूनम यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना सदिच्छा पाठविल्या.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संतोष भंडारी यांनी “शाळा म्हणजे आत्मघडणीचे स्थान” असा संदेश दिला.
सूत्रसंचालन कविवर्य प्रा. विजय अंधारे यांनी ओघवत्या काव्यशैलीत केले, तर आभार प्रदर्शन अमृता अहंकारी यांनी केले.संस्थेच्या वतीने पेढे-लाडू वाटप करून विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले आणि कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.
