महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे नियोजन ढासळले नागरिकांची हेळसांड
सुनील भंडारे पाटील
वाघोली पुणे येथे काल पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नागरिकांना व्यवस्थित कुस्ती स्पर्धा पाण्यासाठी व्यवस्थित सुविधा देण्याऐवजी उलट कुस्तीप्रेमींना सर्वसामान्य नागरिकांना अडचणी उभ्या केल्याचे चित्र पहावयास मिळाले,
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून असणाऱ्या महाराष्ट्र केसरी 2026 ही स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती, वाघोली येथील बाजारतळ मैदान मोठे असून या मैदानावर आवश्यकतेनुसार स्टेज व बैठक व्यवस्था गरजेची असताना हा काय गावचा कुस्तीचा आखाडा होता काय? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे,
कुस्ती टेबलची आवश्यकतेपेक्षा कमी उंची, आवश्यकतेपेक्षा चारही बाजूला कमी जागा त्यामुळे लोकांना कुस्ती व्यवस्थित पाहता आली नाही, पर्यायी व्यवस्था म्हणून वापरण्यात आलेल्या स्क्रीन देखील एकदम लहान होत्या,
कुस्ती ठिकाणाला जोडल्या जाणाऱ्या चारही बाजूंच्या प्रवेशद्वारावर पोलीस व बाऊन्सर तैनात कशासाठी करण्यात आले होते, लोकांना दमदाटी करायला का? या प्रवेशद्वारांवर बाउन्सर नागरिकांना बॅरिगेटच्या आत आले तर ठोकून काढू हाणमार करण्याची धमकी देत होते असे प्रत्यक्ष दर्शनी व नागरिकांनी सांगितले,
संबंधित सर्व प्रवेशद्वारांवर महिला , ज्येष्ठ नागरिक, तरुण यांच्यात अपुरे नियोजनामुळे चिंगरा चेंगरी व धक्काबुक्की होत असल्याचे निदर्शनास आले, संबंधितांची तोंडे अक्षरशा वाकडी होत होती,
एकंदरीत शासनाच्या व जनतेच्या पैशाने भरवण्यात आलेले या स्पर्धेत कुस्ती शौकीन व नागरिकांची मात्र हेळसांड झाल्याचे चित्र स्पष्ट झाले,
भेटवस्तू म्हणून तयार करण्यात आलेली चांदीची गदा ही ट्रॉफी पत्रकारांना व व्हीआयपी लोकांना देण्या ऐवजी आपल्या मर्जीतील काही लोकांना व नातेवाईकांना लहान मुलींना, लहान मुलांना देण्यात आली, यावरून स्पर्धेचा वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोग करून घेतल्याचे निदर्शनास आले आहे,
