March 30, 2026
थोरांदळे येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

थोरांदळे येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न          

आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगिरे

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा थोरांदळे (तालुका आंबेगाव) येथे सांस्कृतिक कला महोत्सव संपन्न झाला.महोत्सवाचे उद्घाटन आय. आय.टी. इंजिनियर्स व मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजर श्वेताताई शेखर विश्वासराव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला व नृत्य सादर केले.सदर कलाविष्काराला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी गावातील इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 36 इंजिनीअर्स भूमिपुत्रांचा तसेच बँकिंग क्षेत्रात काम करणारे सुमारे 15 बँक कर्मचारी व अधिकारी भूमिपुत्रांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, उपसभापती ज्योतीताई पारधी, जिल्हा परिषद सदस्या प्रीतीताई थोरात, पंचायत समिती सदस्या प्रियांकाताई वाघ,गावचे सरपंच जे डी. टेमगिरे, उपसरपंच संदीप टेमगिरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,चांडोली केंद्राच्या केंद्रप्रमुख सीमा कहडणे, मुख्याध्यापक हेमराज भदाणे तसेच,गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

सदर कार्यक्रमासाठी गावातील नोकरदार वर्ग, तरुण मंडळ व ग्रामस्थ यांच्याकडून आर्थिक योगदान लाभले. कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्था शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष दिनेश टेमगिरे, उपाध्यक्ष सागर विश्वासराव,सदस्य सचिन टेमगिरे,मनोहर पोखरकर, अभिजित टेमगिरे,देवराम घुले, रामदास मिंडे,पोपट टेमगिरे,सोनाली भोर, नयन तोत्रे व शाळेतील सर्व शिक्षकांनी पाहिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब कानडे, सूत्रसंचालन विजय डोके,शैला थोरात, श्वेता चिखले,कमल थोरात यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन विनायक पडवळ, संदीप शिंदे,अनिकेत आवटे यांनी केले. आभार मिलिंद चिखले यांनी मानले.