March 30, 2026
लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात काटेकी टक्कर 

लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात काटेकी टक्कर 

सुनील भंडारे पाटील

पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पेरणे या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य पदासाठी दुरंगी लढत होणार असून दोन्ही उमेदवारांची सध्या जय्यत तयारी चालू आहे, त्यामुळे महत्त्वाच्या असणाऱ्या या जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,

या गटामध्ये राजकारणात मुरब्बी असणारे महायुतीचे प्रदीप दादा कंद तसेच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदीप भाऊ कंद या दोघांपैकी कोण गड राखणार व विजयाचा ध्वज कोण फडकवणार याविषयीची चर्चा सध्या लोणीकंद पेरणे गटातील गावांमध्ये चालू आहे,

राजकारणामध्ये चाणक्य समजल्या जाणाऱ्या प्रदीप दादा कंद यांनी विधानसभेत कायम शिरूरचा आमदार ही परंपरा मोडीत काढत यावेळी आमदाराची संधी हवेली तालुक्याला मिळून दिली, त्यासाठी स्वतः खूप मोठा त्याग केला,

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी फुलगावच्या तरुण तडफदार एकनिष्ठ कार्यकर्ता किरण साकोरे यांना संधी दिली, मतदारसंघातील तळागाळातील लोकांना अयोध्या काशी दर्शन घडवण्यासाठी यात्रेचे नियोजन करण्यात आले, या यात्रेची नियोजन मिळावा घेण्यात आला,

राजकारणात कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून जनतेची सेवा करणारे प्रदीप भाऊ कंद यांना राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून उमेदवारी फिक्स झाली असून त्यांनी आयोध्या काशी या आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे, या यात्रेचे नियोजन मेळावा देखील घेण्यात आला,

या मतदारसंघात अशाप्रकारे दुरंगी लढत होणार असून दादा आणि भाऊ यांची ताकद पणाला लागणार आहे, यामध्ये नेमका विजय कोणाचा होणार याकडे मात्र आता जनतेचे लक्ष लागले आहे,