March 30, 2026
लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात नवीन चेहरा समोर राजकारणात गडबड 

लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात नवीन चेहरा समोर राजकारणात गडबड 

भक्तीच्या यात्रांनी रंगला लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गट

सुनील भंडारे पाटील

लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार तसेच लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी या गटातील लोकांसाठी एकूण आठ देवदर्शन आणि तीर्थयात्रांचे आयोजन केले असून, नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या यात्रांमध्ये औदुंबर, नरसोबाची वाडी, आदमापूर, अंबाबाई, ज्योतीबा, पाली, शिर्डी, शेगाव, भीमाशंकर, तुळजापूर, अक्कलकोट, घृष्णेश्वर, भद्रा मारुती तसेच राजस्थानमधील श्री खाटू श्याम मंदिर, दीक्षाभूमी नागपूर, ड्रॅगन पॅलेस आणि हाजीमलंग दर्गा आदी पवित्र स्थळांचा समावेश आहे.

याशिवाय समाजातील लहानग्यांसाठी खास विशेष सहल – राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, कात्रज आयोजित करण्यात आली आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्यांची सांगड घालणाऱ्या या यात्रांमुळे परिसरात श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

जनतेचा हक्काचा माणूस म्हणून ओळखले जाणारे योगेश झुरुंगे यांच्या या उपक्रमामुळे लोकभावनेला धार्मिक उभारी मिळत असून, त्यांची कार्यशैली जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरली आहे. या धार्मिक यात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपले नाव नोंदविण्याचे आवाहन सागर झुरुंगे, राजु झुरुंगे यानी केले आहे.