March 30, 2026

आंबेगाव प्रमिला टेमगिरे 

मंचर
भीमाशंकर रोड लगत असलेल्या वडगाव काशिमबे
(ता आंबेगाव) गावातील वायकरमळा येथील
शेतकऱ्यांनी महावितरण ऑफिस ला दोनदा लेखी तक्रार देऊन देखील तेथील
इलेक्ट्रिक डी. पी. ची वायरिंग नादुरुस्त होती. आणि त्या डी पी पासून
नागरिकांना व पाळीव प्राण्यांना धोका असल्याचे  येथील नागरिकांनी
महावितरणला दिलेल्या लेखी तक्रार निवेदन देऊन महावितरने याची दखल न
घेतल्यामुळे तेथील स्थानिक शेतकरी केरभाऊ डोके यांची शेळीची शिकार
करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा डी. पी च्या वायारींगला स्पर्श लागून जागीच
मृत्यू झाला, असून त्यांनी त्वरित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना
भ्रमणध्वनीद्वारे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली.                

वन्य जीव असो व पाळीव प्राणी अथवा मनुष्य जीव आज बिबट्याचा जीव गेला उद्या
अजुन काही जीवित हानी होऊ शकते
असे अनेक ठिकाणी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वन्य प्राणी पाळीव प्राणी पक्षी ह्यांना
स्वतःचा जीव गमावावा लागला आहे. असे शेतकरी केरभाऊ डोके व शिवराम वायकर
यांनी सांगितले असून त्यांनी वायकर मळा येथील नादुरुस्त असलेली डी. पी.
त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे. बिबट्याचा मृत्यूचा पंचनामा वनविभाग
अधिकारी कांबळे मॅडम व अन्य अधिकारी ह्यांनी केला,