येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 7 अ,12, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी लोकसेवक 1) बाजीराव ज्योतिबा पाटील वय 54 वर्ष, पद कारागृह हवालदार, खुले कारागृह येरवडा पुणे, त्याचप्रमाणे आरोपी 2) रिहाना आसिफ सय्यद वय 48 वर्ष कारागृह आवारातील कॅन्टीन मधील महिला कर्मचारी, यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे, याबाबत तक्रारदार हे येरवडा खुले कारागृह येथे शिक्षा भोगत असून, सध्या ते संचित रजेवर आहेत, त्यांच्या रजेच्या कालावधीमध्ये त्यास बोलावून पाटील याने तक्रारदार याची रजा संपण्यापूर्वी जर त्याने 50 हजार रुपये दिले नाहीत तर त्याच्या गैरवरतूनिकेचा अहवाल पाठवून त्यास खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात पाठविले जाईल, असे धमकावून पाटील यांनी तक्रारदाराकडे 50000 लाचेची मागणी केल्याची तक्रार ला प्र वी पुणे यांना प्राप्त झाली होती,

