March 30, 2026
रांजणगाव गणपती प्रतिनिधी 
         दुर्गजागर प्रतिष्ठानचा  तिसरा वर्धापनदिन ऊत्साहात साजरा करण्यात आला.   किल्ले हडसर गडापासून सुरू झालेला हा प्रवास. तिसरा वर्धापन दिन हा रविवार २० नोव्हेंबर रोजी मल्हारगडावर संवर्धन व स्वच्छता मोहिम करून साजरा करण्यात आला.      

दुर्गजागर प्रतिष्ठानचा हा तिसरा वर्धापन दिन अविस्मरणीय व्हावा ह्या उद्देशाने यावेळी पुण्यातील किल्ले मल्हारगडाची निवड करण्यात आली. नियोजनानुसार सकाळी ८ वा. पुणे, रायगड, ठाण्यामधून असंख्य मावळे आज मल्हारगडी जमले होते. यामध्ये चिमुकल्यांपासून महिला वर्गानेही सहभाग घेतला होता. या महिमेत गडावर स्वच्छता व संवर्धन करून आजचा दिवस दुर्गजागर प्रतिष्ठानने कारणी लावला. ध्येयमंत्र व प्रेरणामंत्राने सुरूवात झालेली ही महिम शिवगीतांनी मल्हारगडावर उत्साहात व आनंदात संवर्धनाची परंपरा कायम ठेवत यशस्वी झाली.  

 वर्धापन दिनाच्या या सोहळ्यास शासनाच्या पुरातत्व विभागाच्या गड स्वच्छता सप्ताहाचेही दुर्गजागर प्रतिष्ठानला जुळता आले हे आणखी आनंदाचे. या मोहिमेत उपस्थित पुणे, रायगड, ठाणे विभागातून आलेल्या मावळ्यांचे आभार व अभिनंदन करून या मोहिमेची सांगता करण्यात आली..