राजगुरुनगर मिलिंद टेमकर
राजगुरुनगर प्रकल्पतील सर्व सेविका मिनी सेविका. मदतनीस, संघटनात्मक मेळावा दि.30जुलै 2022 रोजी संपन्न,
सण 1986साली एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जुन्नर ची निर्मिती झाली. प्रकल्प अंतर्गत लहान मुलांचे कुपोषण निर्मूलन व्हावे म्हणून अंगणवाडी सेविका. मिनी सेविका. मदतनीस यांची नेमणूक करण्यात आली.प्रकल्प निर्मिती मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुरवातीला 50रू मानधन होते.संघर्ष करून सद्या त्यांचे मानधन 8250रू झाले अल्पशा मानधनात काम करावे लागत होते. अंगणवाडी कर्मचारी एकत्र येऊन. एम. ए पाटील मार्गदर्शनाखाली ब्रिजपाल सिंग व व्ही डी दातखिळे तसेच सविंद्रा बोऱ्हाडे यांच्या सहकार्याने खेड तालुक्यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तयार करून पायाभरणी केली. एक एक महिलांना जोडत संघटनेचा बालेकिल्ला खेड प्रकल्पत तयार करण्यात आला.
खेड प्रकल्प मेळाव्याच्या निमित्ताने अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. मानधन वाढ करा. पेन्शन योजना लागू करा. आजारपणाची रजा द्या. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे.लहान मुलांना चांगल्या प्रतीचा आहार द्या. अमृता आहारातील दरवाढ करा.आशा अनेक अत्यंत महत्वाच्या विषयवार संघटनात्मक चर्चा करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय सेवेत वर्ग करून स्पे स्केल लागू करण्याबाबत औद्योगिक न्यायालय पुणे येथे केस घालण्यात आली आहे.आदीवासी भागातील पेसा अंतर्गत ए पी जे अमृत आहार देण्यात येतो. महागाईच्या दृष्टीने दरवाढ न झाल्यामुळे दि 1सप्टेंबर 2022पासून लाभार्थी यांना वाटप न करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी यांनी घेतला आहे.
अंगणवाडी कर्मचारी यांच्या मागण्यासाठी केंद्र व शासन स्तरावर या पुढे अनेक लढे देण्याबाबत संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला. कोव्हीड 19मध्ये अंगणवाडी कर्मचारी यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता कोव्हीड चे काम जिगरीने काम केले. समाजामध्ये उल्लेखनीय काम करून स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे.
मेळाव्याच्या निमित्ताने नवीन प्रतिनिधी नेमणूक करण्यात आली. तालुका अध्यक्ष पदी सरला उडाने . तर तालुका सचिव पदी आरती थिगळे तालुका कार्याध्यक्ष अपर्णा वाघुले तालुका उपाध्यक्ष लिंबोरे यांनीची नेमणूक करण्यात आली आहे .संघटनात्मक
सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून अनिता शिंदे. रेणुका व्यवहारे यांची नेमणूक करण्यात आली.
तसेच प्रज्ञान कमेटी मध्ये वंदना कोळी. माया राक्षे. पुष्पा वाढणे उर्मिला बोंबले यांची नेमणूक करण्यात आली.काही बिट मध्ये बिट प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आली.भारतीय महिला फेडरेशन तालुका प्रतिनिधी म्हणून शैलेजा गुजराथी यांची नेमणूक करण्यात आली आहे.तसेंच सेवानिवृत्त महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी यांची पटसंख्या वाढवी तसेच लहान मुलांचे कुपोषण निर्मूलन करावे. पूर्व प्राथमिक शिक्षण लहान मुलांना देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सातत्याने प्रयत्न करतील. गरम व ताजा आहारापासून लाभार्थी वंचित राहणार नाही. या बाबतीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघांचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड निलेश दातखिळे व जिल्हा अध्यक्ष सविंद्रा बोऱ्हाडे व जिल्हा कार्याध्यक्ष शारदा शिंदे. जिल्हा उपाध्यक्ष सुमन फादाले जिल्हा सचिव नयना वाळुंज यांनी उपस्तित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.खेड तालुका मेळाव्याला जिल्हा उपाध्यक्ष पूनम निंबाळकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.जिल्हा सोशल मीडिया प्रतिनिधी सोनाली पावडे यांची निवड करण्यात आली.
मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार सुप्रिया पवार यांनी केले.केंद्र सरकारने व महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन जगण्या इतके वेतन द्यावे अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांची आहे. बिट प्रतिनिधी सुंदर धायबर. अनुराधा गावडे. सविता वाडेकर. सलमा तांबोळी स्वाती भदाले.उपस्थित होत्या. तालुक्यातील अनेक अंगणवाडी
कर्मचारी उपस्थित होते.

