March 30, 2026
 सुनील भंडारे पाटील 
             आज नसरापूर महावितरण कर्मचाऱ्याने नसरापूर ते वेल्हे रोड वरील ज्या दुतर्फा लघुदाब  विदयुत वाहिन्या आहेत. त्या वरील आलेल्या  झाडाच्या  फांद्या वेली  पूर्ण पणे  छाटणी केली कारण पावसाळ्याचे दिवस आहेत.  व त्या मुळे अवकाळी वादळी वाऱ्याचा वेग वाढला आहे.  त्यामुळे जी झाडे व त्याच्या फांद्या पडून विदूतवाहिनी तुटु शकते व  त्याच्या मुळे होणारे अपघात व विजेची तार तुटुन मानवाच्या जीवाला  होणार धोका  निर्माण होऊ शकतो.            

त्या साठी  नसरापूर गावातील महावितरण  वरीष्ठ तंत्रज्ञ कर्मचारी  समीर मुजावर, व कैलास मोहिते वायरमन, आणि नसरापूर शाखेचे सर्व सहकारी  कैलास भोये, महेश बांदल, संतोष नाईलकर , राजकुमार कदम,  व  सात ते आठ लोकांच्या टीम ने नसरापूर गावातील  लोकांच्या  , येजा करणारे प्रवाशी , शाळेचे विद्यार्थी  हिता साठी व जीवाला धोका होऊ नये म्हणुन या नसरापूर गावाच्या दोनी बाजुस लघुदाब विदुतवाहिनी वाहिनी वरील पूर्ण झाडे छाटून  त्यानी विदूतवाहिनी सुरळीत केली आहे.  जेणे करून पावसाळ्याच्या दिवसात नसरापूर गावा  मधील नागरिकांना व ग्रामस्थांना अंधारात बसण्याची वेळ येणार नाही.  व नसरापूर ग्रामस्थांनी नसरापूर महावितरण चे आभार मानले आहेत.