March 30, 2026

 

सुनील भंडारे पाटील 
 
      शिरूर तालुका राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश च्या शिरूर
तालुका अध्यक्ष पदी पत्रकार साहेबराव लोखंडे यांची फेरनिवड झाली याबद्दल
महाराष्ट्र राज्याचे मा. गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते
सन्मान करण्यात आला. 
        

घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष कै.रंगनाथ थोरात यांच्या कुटुंबाचे
सांत्वन करण्यासाठी वळसे पाटील  आमदाबाद येथे आले होते . यानंतर त्यांनी
टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामुशेठ घोडे यांच्या निवासस्थानी
कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 
              

यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त
निकम,शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी चे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिरूर बाजार
समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, शिरूर तालुका पंचायत समितीच्या माजी
सदस्या अरुणाताई दामुशेठ घोडे, टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामुशेठ
घोडे,पुणे जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर
गावडे,चेअरमन व दत्तात्रय वळसे पाटील बैलगाडा विमा कंपनीचे उपाध्यक्ष
बन्सीशेठ घोडे,दिंडी मंडळाचे उपाध्यक्ष नारायण कांदळकर, सोसायटी चे माजी
संचालक कुशाभाऊ पवळे, उद्योजक बाबाजी साबळे, पंढरी उचाळे, विक्रम
घोडे,संतोष घोडे, फकिरा घोडे , मारुती नरवडे,संजय टेमकर, अमोल रसाळ, दामु
आण्णा घोडे प्रतिष्ठान चे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते.