वरीष्ठांच्या आदेशाचे तसेच २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाचे अनुशंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये दि. २३/०१/२०२३ रोजी रात्री तपास पथक अधिकारी पोउपनि अमित गोरे व तपास पथकातील स्टाफ असे हॉटेल, लॉज चेक करणे, तसेच पाहीजे व फरार आरोपीचा शोध घेणेकामी पेट्रोलींग करत असताना दि. २४/०१/२०२३ रोजी ०२/१० वा चे सुमारास ११२ नंबरवरुन लोणीटाऊन रात्रपाळी बीट मार्शल कर्मचारी पोशि आडके व पोशि भगत यांना कॉल प्राप्त झाला की, “७ ते ८ इसम हे म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजचे जवळ हत्यारासह थांबले असुन ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवत आहेत” वगैरे माहीती प्राप्त झाल्याने बीट मार्शन यांनी रात्र गस्त अधिकारी पोउपनि वैभव मोरे यांना सदर बाबत कळविले असता त्यांनी या बाबत दत्तात्रय चव्हाण, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पो स्टे पुणे यांना कळविले. तेंव्हा मा. वपोनि यांनी तपास पथकासह घटनास्थळी जावुन सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने तपास पथकातील पोउपनि गोरे, पोहवा आनंद पाटोळे, पोना श्रीनाथ जाधव, पोशि शैलेश कुदळे, पोशि बाजीराव वीर, पोशि नितेश पुंडे, तसेच रात्रगस्त अधिकारी पोउपनि वैभव मोरे व लोणी टाऊन बीट मार्शल कर्मचारी पोशि आडके, पोशि भगत असे दोन पंचासह घटनास्थळी गेले असता म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजचे पलीकडे उजव्या बाजुस वळणावर पाच ते सहा इसमांमध्ये धावपळ उडुन ते त्या ठिकाणाहुन पळुन जात होते. त्या वेळी वरील प्रमाणे पोलीस स्टाफने त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन पोउपनि गोरे यांनी सदर इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव (१) प्रेम राजु लोंढे वय १९ वर्षे रा. रेल्वे गेट जवळ आळंदी रोड ता हवेली जि पुणे मुळ रा. जामखेड, गोरोबा थीएटर जवळ, अहमदनगर (२) ऋषिकेश उत्तम लोंढे वय २६ वर्षे रा. पानमळा रोड ता हवेली जि पुणे मुळ रा. बाबळगाव जि बिड (३) गणेश भगवान खलसे वय २२ वर्षे रा. माळवाडी कुंजीरवाडी ता हवेली जि पुणे (४) तानाजी भाऊसाहेब गावडे वय २३ वर्षे रा. माळवाडी • कुंजीरवाडी ता हवेली जि पुणे अशी कळविली. उर्वरीत दोन इसम हे अंधाराचा फायदा घेवुन तेथेन पळुन गेले. ताब्यात घेतलेले इसम हे लोणीकाळभोर पो स्टे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने पोउपनि गोरे यांनी दोन पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता वर नमुद आरोपीतांच्या जवळ २ लोखंडी पालघन, मिरची पुड, बॅटरी, नायलॉन दोरी, एक घट्ट चिकटपट्टी अशा वस्तु मिळुन आल्याने पोउपनि गोरे यांनी पंचा समक्ष इसम नामे प्रेम राजु लोंढे वय १९ वर्षे यास त्यांच्या ताब्यात मिळुन आलेल्या सदर वस्तु बाबत विचारपुस केली असता प्रेम लोंढे यांने सांगीतले की, “तो व त्याचे पाच साथीदार मिळुन कुंजीरवाडी येथील ॲटोकॉर्नर एच पी पेट्रोल पंप, ता हवेली जि पुणे या ठिकाणी दरोडा टाकण्यासाठी जात असले” बाबत कबुली दिल्याने सदर आरोपीतां विरोधामध्ये लोणीकाळभोर पो स्टे पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि अमित गोरे हे करीत आहेत.

