माऊली सेवा प्रतिष्ठान राजगुरुनगरच्या वतीने दिवाळीत मोठ्या प्रमाणात राजगुरुनगरमधील नागरिकांकडुन जुने परंतु वापरण्यायोग्य चांगले कपडे गोळा करण्यात आले होते. त्या कपड्यांचे वाटप दुर्गम भागात आंबोली टेकवडी औदर येथील कातकरी ठाकरवाडी वस्तीत केल्यानंतर राजगुरुनगर आणि परिसरातील गरजूंनी माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक कैलास दुधाळे यांच्याकडे आम्हाला देखील कपडे मिळावेत अशी आशा व्यक्त केली.
त्यानुसार दिवाळीनंतर सुध्दा नागरिकांकडुन कपडे गोळा करण्याचे काम सुरु ठेवण्यात आले असता आजपर्यंत मोठ्या प्रमाणात कपडे गोळा करण्यात आले होते. जमा झालेल्या कपड्यांचे व्यवस्थीत रित्या सॉर्टींग करण्यात आले कपडे सॉर्टींगमुळे ५ महिलांना रोजगार उपलब्ध झाला.
या वेळी भोपाळबुवा महाराज तरूण मित्र मंडळासह सामाजिक कार्यकर्ते Bmcc गृपचे अध्यक्ष राहुलदादा पिंगळे पिंटु गावडे नरेंद्र कानडे संजय घुमटकर सर नामदेव कुंभार मछिंद्र पवळे पत्रकार नाझीमभाई ईनामदार वैभव वाघमारे दिलीप राक्षे दयानंद तळेकर सुधीर येवले मंगेश रोंघे नितीन कोहिनकर सुनिल सातव दता रुके कैलास मुसळे तसेच सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई गाडगे लक्ष्मी सातव सपना ढोबळे प्राजक्ता बच्छाव मनीषा कुलकर्णी यांचे अनमोल सहकार्य लाभले.खेड तालुक्यातील गरजूंना कपडे मिळावेत यासाठी वर्षभर कपडे गोळा केले जानार आहे.



