March 30, 2026
स्व.जमादार वामन घोडे पाटील
शिरूर विशेष प्रतिनिधी 
कवठे येमाई ता.शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते, गावच्या विकासाच्या जडणघडणीत ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ते स्व.जमादार वामन घोडे पाटील वय वर्ष ८५ वर्ष यांचे दुःखद निधन झाले.      

कवठे येमाई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे मा.चेअरमन बबनराव बाळासाहेब पोकळे यांचे ते मेव्हणे तर कोहिनूर उद्योग समूहाचे चेअरमन पैलवान स्वप्निल गावडे यांचे ते काका होत.

         त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी,सूना,नातवंडे असा परिवार आहे. कवठे येमाई गावचे मा.ग्रामपंचायत सदस्य संतोष घोडे,पुणे महानगर पालिकेचे आदर्श शिक्षक शरद घोडे यांचे ते वडील होत.     

त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.गावच्या सर्वांगीण विकासात त्यांच्या नेहमीचा मोलाचं वाटा होता.ग्रामस्थ त्यांना पाटील या नावाने ओळखत असत.

  महाराष्ट्र राज्याचे मा.गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे साहेब, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी शोक व्यक्त केला.