संकष्ट चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या. शनिवार दि . १६ जुलै २०२२ रोजी संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक, तसेच १२ वाजता महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला. संकष्टी चतुर्थी निमित्त प्रगतशील शेतकरी श्री नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबाणीस संतोष रणपिसे पुजारी प्रसाद कुलकर्णी , मकरंद कुलकर्णी व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


