March 30, 2026
उरळी कांचन सचिन सुंबे 
                करोनाच्या महामारी मुळे दोन वर्षाच्या काळखंडा नंतर शुक्रवार दिनांक २४  जुन रोजी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी
साेहळयाचे पुणे शहरातून ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर
येथे आगमन होत आहे . पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा परिषद
,हवेली तालुका पंचायत समिती , लोणी काळभोर ग्रामपंचायत , लोणी काळभोर पोलीस
स्टेशन  सज्ज झाले आहे .विविध ठिकाणी  तयारी पुर्ण करण्याचे काम युद्ध
पातळीवर चालू आहे .
           

    साेहळ्याच्या
आगमनाच्या कालावधीत सार्वजनिक स्वच्छता आणि  आरोग्य सुविधा देण्यात येणार 
असल्याची माहिती  हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ .सचिन खरात ,
माजी  जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार  ,माजी पंचायत समिती सदस्य सनी
काळभोर  यांनी दिली.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .भगवान पवार 
मार्गदर्शनाखाली डॉ सचिन खरात ,डॉ डी. जे .जाधव डॉ भंगाळे  व हे पालखीतील
वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा देणार आहेत .दिंडीला आरोग्य किटचे वाटप
करण्यात येणार असुन २४  तास आराेग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे .

पालखी
मुक्कामाच्या ठिकाणाची  माहिती देताना सरपंच माधुरी काळभोर यांनी सांगितले
की पालखी गावात येताना लोणी काँर्नर येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या
रस्त्याची साफसफाई तसेच गावातील  रस्त्याची दुरुस्ती केली आहे. पाण्याचे
शुध्दीकरण करणे  ,दोन दिवस गावात औषध फवारणी करणे ,वारकऱ्यांना आंघोळीसाठी
पाच ठिकाणी सोय करणे ,गावातील ९० सार्वजनिक शौचालय दुरुस्ती ,तसेच संपूर्ण
परिसरात साफसफाई चालू  आहे. निर्मळ वारीतील ८०० मोबाईल शौचालयाला जागा
उपलब्ध करून दिली जाणार असून पिण्याच्या पाण्यासाठी पाच ठिकाणी टँकर
भरण्याची सोय केली असल्याचे माधुरी  काळभोर यांनी सांगितले.पालखीचे आगमन विठ्ठल मंदिरात होणार असुन संपूर्ण मंदिर स्वच्छ करून पाण्याने  मंदिर धुवून काढले आहे.  तसेच वारकऱ्यांच्या
निवाऱ्यासाठी बाजार शेड येथील पत्रा शेड ,विविध शाळा ,मोकळे मैदान 
इत्यादी ठिकाणी सोय केली जाणार असल्याचे माजी उपसरपंच  व विदयमान
ग्रामपंचायत सदस्य योगेश काळभोर  यांनी सांगितले. 
                 ग्रामपंचायत
सदस्यांना बरोबर घेऊन पालखी सोहळा यशस्वी करण्याची तयारी झाली असल्याची
माहिती माजी सरपंच व विदयमान ग्रामपंचायत सदस्य  राजाराम काळभोर यांनी
दिली. 
यावेळी  ग्रामसेवक जे .एस. बोरावणे , राजेंद्र काळभोर ,अमित काळभोर ,नागेश काळभोर ,आदी उपस्थित होते. लोणी
काळभोर पोलिस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  राजेंद्र मोकाशी  यांनी
सांगितले की पालखी सोहळ्याच्या वेळेस कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे .
वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून  साखळी चोर ,पाकीटमार  यांच्यावर 
सीसीटीव्ही मार्फत  नजर ठेवण्यात येणार आहे . पालखी साेहळ्यातील ट्रक पुढे
मार्गस्थ करण्यासाठी त्यांच्याकरीता स्वतंत्रपणे वाट निर्माण करून देणार
आहे .लोणी गावात पालखी सोहळयाचे आगमना पर्यंत वाहतूक बंद करण्यात येणार आहे
.अशा प्रकारे विविध पातळीवर लोणी काळभोर येथे पालखी सोहळ्याच्या आगमनाची
तयारी केली जात आहे . यावेळी हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के,
थेऊरच्या मंडळ अधिकारी गौरी तेलंग यांनी कामाची पाहणी केली .