शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
राष्ट्रीय फेडरेशन चषक कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालय व कै.बाबासाहेब रिसबूड व्यवसाय अभ्यासक्रम न्हावरे येथील व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील विद्यार्थी अथर्व नामदेव चव्हाण याने खुल्या गटात ११० किलो वजन गटात नेत्रदीपक कुस्ती करून कास्यपदक पटकाविल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉ.शाहीद शेख व व्यवसाय अभ्यासक्रमाचे विभागप्रमुख प्रा. आर.डी.जगताप यांनी दिली.
दिल्ली येथे पार पडलेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अथर्व चव्हाणने हे यश मिळविले. पारगाव (ता. दौंड) येथील कर्मयोगी कुस्ती केंद्रात अथर्व याने राष्ट्रीय कुस्ती पंच रवी बोत्रे यांच्याकडे कुस्तीचे प्रशिक्षण घेतले आहे. सध्या तो शिवराम (दादा) तालीम पुणे येथे महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. अथर्व हा करडे (चव्हाणवाडी )येथील रहीवासी आहे. अथर्व चव्हाण याचे विद्यालयाचे प्राचार्य डॉ.शाहीद शेख, पर्यवेक्षक संजय चव्हाण, व्यवसाय अभ्यासक्रम, कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

