March 30, 2026
विशेष प्रतिनिधी 
            राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या यवतमाळ आणि वाशिम संपर्क प्रमुख पदी प्रकाश पाटील बूटले यांची निवड

            पत्रकार दिनाचे औचित्य साधून देशोन्नती चे पत्रकार प्रकाश पाटील  बुटलें  यांची राज्य मराठी पत्रकार परिषद यवतमाळ वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख या पदी राज्य अध्यक्ष श्री मधुसूदन कुलथें  यांच्या आदेशाने संदीप ढाकुलकर शिरूर तालुका राज्य मराठी पत्रकार परिषद संघटक यांनी नियुक्ती पत्रा दिले या वेळी सचिन ठाकरे शुभम गरुड गोपाळ  ठाकरे आदी उपस्थित होते या वेळेस बुटले यांनी बोलताना  सांगितले की विदर्भात परिषद मोठ्या ताकतीने वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन आणि संघटन सुद्धा चांगल्या प्रकारे करेन असे आश्वासन दिले