गेल्या पंधरा दिवसापासून जालना मध्ये मनोज जरांगे यांनी मराठ्यांना सर्व क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी शांततेच्या मार्गाने अमरण उपोषण चालू केले आहे, आज कित्येक दिवस उलटूनही राज्य शासन या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सक्रिय असताना देखील निर्णय घ्यायला खूप उशीर लागत आहे, त्यामुळे जरांगे यांची प्रकृती आता खालावली असून राज्याच्या सर्व ठिकाणी आता आंदोलनाची तीव्रता वाढली आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आत्तापर्यंत राज्य शासन तसेच लोकनेते या मुद्द्याकडे कायम बघ्याची भूमिका घेत आहेत,
आज बुधवार दिनांक 13 रोजी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, धर्मपीठ, शक्तीपीठ, प्रेरणापीठ, श्रीक्षेत्र वढू बुद्रुक ( तालुका शिरूर ) येथे व्यवसायिकांनी आपली दुकाने सकाळ पासून बंद ठेवून कडकडीत असा बंद पाळला, तसेच या गावबंदचे निवेदन शिक्रापूर पोलीस स्टेशनला देण्यात आले, राज्य शासनाने तातडीने मराठ्यांना आरक्षण देऊन या मुद्द्याला पूर्णविराम देत जरांडे पाटील यांचे उपोषण थांबवावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली, शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अशोक केदार यांनी सांगितले,
