प्रतिनिधी लोणीकंद
लोणीकंद (ता. हवेली ) ता. ०९ जानेवारी २०२४ रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पेरणे पोलीस चौकीचे हद्दीत मौजे पेरणे गावचे हद्दीत कोळपे वस्ती, पेरणे बकोरी शिवलगत ओढयाच्या कडेला तसेच भावडी गावातील बोरकर वस्ती येथे सुरु असलेला दारुच्या हातभट्टया लोणीकंद पोलीसांनी जेसीबीच्या साह्याने उध्वस्त केल्या हातभट्टयी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल दोन्ही ठिकाणी मिळून एकूण १०९४००/- रुपये किंमतीचे गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य उध्दव केले .
मा.अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी आदेश करूनही काही ठिकाणी अवैध धंदे चालविणारे हे लपुन छपुन भट्टी लावुन गावठी दारु तयार करीत असल्याची माहिती गुप्त बातमी दारामार्फत प्राप्त झाली त्यानुसार दिनांक ०८/०२/२०२४ रोजी लोणींकंद पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, बाळासाहेब सकाटे, रोकडे, सपुरे, कोकरे यांचे एक पथक तसेच पेरणे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, तपास पथकातील फरांदे, साळुंके, जाधव असे पथक तयार करुन त्यांना वाघोली पोलीस चौकीचे हद्दीत ग्रामीण भागातील डोंगराळ व दुर्गम भागातील ओढे व नदीलगत चालु असणा-या हातभट्टयांवर कारवाई करण्यासाठी पथक रवाना झाले व लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे तसेच पेरणे चौकीचे अधिकारी निलेश घोरपडे व तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे व पथक यांनी मौजे पेरणे गावचे हद्दीत कोळपे वस्ती पेरणे बकोरी शिव लगत ओढयाच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत माधुरी रमेश परदेशी ही गुळमिश्रीत रसायनचा वापर करुन हातभट्टी लावुन गावठी दारु तयार करीत होत्या सदर ठिकाणी छापा टाकुन एकुण ६०,६००/- रुपये किंमतीचे गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कच्चे रसायन, तयार गावठी दारु ही जेसीबी च्या साहय्याने उध्दव करुन माधुरी रमेश परदेशी, वय ४० वर्ष, रा. कोळपे वस्ती, पेरणे, ता. हवेली, जि. पुणे हिचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौज भावडी गावातील बोरकर वस्ती या ठिकाणी साहिल संजय राजपुत हा गुळ मिश्रीत रसायनचा वापर करुन हातभट्टी लावुन गावठी दारु तयार करीत असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन एकुण ४८,८००/- रुपये किंमतीचे गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कच्चे रसायन, तयार गावठी दारु ही जेसीबी च्या साहय्याने उध्दव करुन साहिल संजय राजपुत, वय २५ वर्ष, रा. बोरकर वस्ती, भावडी, पुणे याचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी विजय मगर पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, संजय पाटील, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली मा. विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, सपोनि रविंद्र गोडसे, सपोनि निलेश घोरपडे, पोउपनि राहुल कोळपे, सपोफौ बाळासाहेब सकाटे, पोलीस अंमलदार कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, साईनाथ रोकडे, मल्हारी सपुरे, दिपक कोकरे, अजित कारकुड, विठ्ठल केदारी, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर हददीमध्ये कोठेही अवैध धंदे चालू असतील त्याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर मो.नं.९५२७०६९१०० यावर संपर्क साधणे बाबत . विश्वजित काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी आवाहन केले आहे.
