धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढु बुद्रुक, तुळापूर या महत्त्वाच्या दोन गावांच्या मधोमध भीमा नदीच्या तीरावर बसलेले फुलगाव हे गाव, या गावाला जुन्या बाजारपेठेचा वारसा आहे, या गावांमध्ये असलेली पुरातन वास्तू म्हणजे पेशवेकालीन कमानी घाट, भीमा नदीच्या तीरावर जुन्या काळातील श्री मारुती मंदिर तसेच श्री शनी मंदिर या ठिकाणी भाविकांची सतत गर्दी असते, अलोट निसर्ग सौंदर्याने नटलेला आजूबाजूचा परिसर आणि भीमा नदीच्या काठावर असलेला कमानी घाट पर्यटकांना आकर्षित करीत आहे, पेशवेकालीन निर्मित असलेले या कमानी घाटाचे सुंदर, रेखीव बांधकाम पाहता क्षणी लोकांची मने जिंकत आहे, या कमानी घाटाचे काम पाहता पूर्णपणे दगडी बांधकाम आहे, पुरातन काळातील इंजिनिअरिंगचा एक महत्त्वाचा नमुना हा कमानी घाट पाहिल्या नंतर आपल्या लक्षात येते, पूर्ण वर्षभर घाटाच्या पायऱ्यापर्यंत नदीचे पाणी असते, श्री मारुती मंदिर आणि श्री शनी मंदिर मधील देवाचे दर्शन घेतल्यानंतर पर्यटक हा कमानी घाट पाहण्यासाठी आवर्जून जातात, कमानी घाटाचे सौंदर्य पाहून पर्यटकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही,

