गेल्या काही दिवसांपासून कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील ऐतिहासिक ब्रिटिश कालीन वास्तु जयस्तंभ तसेच कोरेगाव भीमा आणि पेरणे या दोन गावांना जोडणारा पूल या जवळून टोरेंट गॅस कंपनीच्या वतीने पुलाच्या अगदी जवळ बगलेला मोठी ड्रिल मशीन लावून पूर्व बाजूंनी भीमा नदीच्या भूभागातून पश्चिमेकडे ऐतिहासिक जयस्तंभाच्या बाजूला ड्रिल मारण्याचे काम चालू आहे, वास्तविकता संबंधित कंपनीने काढलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीमध्ये मोऱ्या तसेच लहान,मोठे पूल या जवळून पाईपलाईन टाकू नये असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे,
परवानगी मधील सर्व नियम अटी चे पालन करणे टोरेंट कंपनीला बंधनकारक असून मग या कंपनीकडून नियमांचे उल्लंघन का केले जाते? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे, ही बाब जनतेच्या लक्षात आणून देणे भरारी न्युज चे कर्तव्य असल्याने, वाचकांनी तसेच ग्रामस्थांनी कृपया सार्वजनिक बांधकाम विभागाची महत्वाची प्रत या बातमीमध्ये प्रसिद्ध केली आहे, कृपया लाल कलर मध्ये रेखांकित केलेला कॉलम पहावा म्हणजे आपल्या लक्षात येईल, टोरेंट कंपनीचे चाललेले काम योग्य की अयोग्य,
