March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
        पिंपरी सांडस (तालुका हवेली) येथे आज रात्री पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन मेंढ्या मृत्युमुखी पडल्या, त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत,  

सद्यस्थितीत हवेलीच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले असून, शेतकऱ्यांना आता मात्र घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे, परवा पूर्व हवेलीत केसनंद येथे बिबट्याचे दर्शन झाले होते, आता पूर्व हवेलीतील पिंपरी सांडस या गावांमध्ये आज पहाटे बिबट्याने पिंपरी सांडस येथील लोणारे वस्तीवरील बाळासाहेब आवडा भाऊ श्रीराम यांच्या गोठ्यामधील पाळलेल्या तीन मेंढ्यांपैकी मध्यरात्री अडीच वाजता बिबट्याने हल्ला करून दोन मेंढ्या मारल्या,

त्यामुळे श्रीराम यांचे नुकसान झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे, या बिबट्याचे पकडण्यासाठी वन खात्याने ताबडतोब पिंजरा लावावा अशी मागणी पिंपरी सांडस ग्रामस्थांकडून होत आहे, या बिबट्यापासून  धोका होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, रात्री अपरात्री बाहेर पडू नये  असे आवाहन शेतकरी बाळासाहेब श्रीराम यांनी केले आहे,