शिरूर प्रतिनिधी
माझे पुणे विदयापीठ,रानडे इन्स्टिटयूट पत्रकारिते मधील मित्र. विनीत केंजळे,बांधकाम व्यवसायिक,रायडर, जुन्या गाड्याचे संकलन करून वारसा जपणारे. यांच्या मुलीने सिया हिने कालच्या शनिवारी जुन्नर भागातील जीवधन किल्ला आणि त्या शेजारील ” खडा पारशी ” ( वांदरलिंगी) या सुळक्यावर व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलींग केले . मुंबई पुण्याच्या कुठल्याशा ग्रुप्स ने संयुक्त पणे हा साहसी कार्यक्रम आयोजित केला होता . सिया ने इतकी साहसी मोहीम पूर्ण केली याचा परिवाराला खूप आनंद झाला .
” खडा पारशी ” सुळका सह्याद्रीच्या कोकण कड्यावर अत्यंत दुर्गम ठिकाणी आहे . खाली ” आ ” वासून असलेली १००० फूटांची दरी जीवधन किल्ला ते खडा पारशी यांतील अंतर साधारण चारशे फूट तर खडा पारशी वरून खाली साधारण पाचशे फूटांचे रॅपलींग . उतरताना ही लॅंडींग अत्यंत घसरड्या ठिकाणी . त्यातही भरीस भर म्हणून जीवधन वरून व्हॅली क्रॉसिंग करून गेल्यावर जेथे खडा पारशी च्या टॉप वर उतरतो त्या ठिकाणच्या जागेची परिस्थिती काय वर्णावी ? जेमतेम तिन चार जण कसे बसे उभे राहू शकतील अशी जागा ती देखील सपाट नाही तर उबड खाबड अशी चुकून तोल गेला तर सरळ हजार एक फूट दरी मध्ये. जीवधन किल्ला आहेच नाणेघाटाच्या तोंडावर त्याचे रक्षण करत उभा ज्या ठिकाणी सह्याद्रीचे अक्राळविक्राळ रूप पहायला मिळते .
इतक्या अवघड ठिकाणी जाऊन पर्वता रोहणातील क्रिडा प्रकार यशस्वी करणाऱ्या संस्था चालकांचे देखील विशेष कौतुक केले पाहिजे .मला लहानपणापासून या साहसी खेळाची आवड आणि आकर्षण राहिले आहे . तरूण पणात अक्षरशः झपाटल्यागत सह्याद्री आणि हिमालयात सातत्याने वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या त्या वेळी आमच्या कडे संसाधने अत्यंत कमी असत पण पुणे, मुंबई, ठाणे येथील मित्रांच्या सहाय्याने आम्ही त्या मोहिमा राबवत असू . आज त्या सर्व गोष्टी आठवत आहेत या भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केल्या व अभिमानाने म्हणाले कि,
मला ज्या वेळी दोन्ही मुली झाल्या त्या वेळी असे वाटले होते . आपल्या नंतर आपल्या घरातील कोणी या साहसी खेळात भाग घेऊ शकतील ? पण नियतीचा खेळ पहा गेले काही वर्षे सियाला या साहसी खेळाची आवड निर्माण झाली . वेल्हा येथील मढे घाटातील वॉटर फॉल रॅपलींग, एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक, कळसूबाई, वासोटा या सारख्या कितीतरी साहसी मोहिमा तीने यशस्वी पार पाडल्या आहेत . आता तिला हे साहसी जीवन खूप आवडू लागले आहे. हे सर्व पाहता मला या नियतीच्या खेळाची आता गंमत वाटते आहे . मला इतकी वर्षे वाटत होते मुलगा असता तर माझ्या नंतर तो या धाडसी आणि साहसी खेळात सहभागी झाला असता पण सिया मुलगी असून शहरातील सुखासीन आयुष्य बाजूला ठेवत या साहसी खेळात आनंदाने सहभागी होत आहे हे पाहिल्यावर तिचे फार कौतुक वाटते .नाही तरी आम्ही ” केंजळे कुटुंबिय” आहोतच परंपरा वादी.अश्या या केंजळे परिवारातील वंशाचा दिवा असणाऱ्या सिया हीला खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन तसेच पुढील मोहिमा अश्याच पद्धतीने पूर्णतःवास नेशील या सदिच्छा व पुन्हा एकदा भरारी न्युजच्या वतीने खूप खूप अभिनंदन,
