March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
             मराठा योध्दा मनोज दादा जरंगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे तब्येत खालावत चालली आहे. 
शासनातील व विरोधातील रोज काहीतरी वायफळ बडबड करून,एकमेकावर आरोप करून, दुसऱ्या पक्षात प्रवेश करून. जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत.

              आपणास जरांगे पाटील यांची तब्येत महत्त्वाची आहे. आपण प्रत्येक गावात वेशीवर रोज शंभराचे संख्येने चक्री उपोषण तात्काळ सुरू करूया. शांततेत आंदोलने सुरू करूया. तरच या सरकारला जाग येईल.  गल्लोगल्ली ,गावात ,तालुक्याचे ठिकाणी मराठा बांधवांच्या मिटींगा आयोजित कराव्यात. आता स्वस्थ बसू नये. सोशल मीडियावर मराठा आरक्षण व मनोज दादा जरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या बातम्या फिरवा. ही वेळ महत्वाची आहे. बांधवांनो. मराठा नेते आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात.त्यांना समाज महत्त्वाचा नाही. कोणीही उघड भुमिका घेत नाही.