March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
       शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांना दि . २८ रोजी अवैध धंदेवाल्यानी संपविण्याची धमकी दिल्याचे व पोलीसांनीच बारहातेचे या दारु धंदेवाल्याना नाव सांगीतलेने त्यांचेवर कारवाई व्हावी , असे निवेदन शिरूर तालुका पत्रकार संघातर्फे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना दिले,  

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचेअध्यक्ष शरद पाबळे यांचे नेतृत्वाखाली पत्रकार हल्लाविरोधी संघटना अध्यक्ष के . डी . गव्हाणे , पुणे जिल्हा पत्रकारसंघाचे उपाध्यक्ष सुनिल भांडवलकर, शिरूर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मुकुंद ढोबळे, प्रवीण गायकवाड, समन्वयक पोपट पाचंगे, मदन काळे, धर्मा मैड ,सिकंदर तांबोळी , शरद राजगुरु, ज्ञानेश्वर मिडगुले, राजाराम गायकवाड , मनिषा राजगुरु, भरत घोडे, नवनाथ रणपिसे आदींनी बारहाते परीवारास संरक्षण देवून गुन्हेगारी रेकॉर्ड व परीसरात दहशत असलेल्यानी पत्रकारास मळगंगा मंदिर परीसरात नवरात्रोत्सवाचे कार्यक्रमादरम्यान पब्लिकमध्ये संपविण्याची धमकी देणाऱ्या जगन काळे, त्याची २ मुले, अनिल पिंगळे, शाहूरूप पिंगळे व सोबतच्या पाच सहा जनांवर कारवाई व्हावी व दारुवाल्यांवर धाड टाका असे पोलिसानी बारहातेंचे नाव सांगून त्यांना भडकावून देत स्वतः गोड रहाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसांची चौकशी व्हावी अशी मागणी केली . बारहातेंचे वडीलांनाही परीवारास सोडणार नाही अशी धमकी काल या गुन्हेगारांनी दिली . विशेष म्हणजे याच बारहातेनी कोरोना काळात अशा शेकडो पारधी व वंचित कुटुंबीयाना मदत केली . आणि उलटा कानून पहा,पोलिसांना एखादी माहीती देणाऱ्या खबऱ्यांना बक्षीसी दिली जाते व इथे स्वतः वाईट व्हायल नको म्हणून पत्रकाराचे नावाआड दडून ही आग सहज पेटविणाऱ्या पोलिसांचे  शौर्याची किव करावी कि त्यांना निलंबित करावे हे काळच ठरवेल . सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस अधिक्षक यांनाही देऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी अशी पत्रकार संघाची मागणी आहे .