March 30, 2026
शिरूर विशेष प्रतिनिधी
        टाकळी हाजी ता. शिरूर येथील ललिता महादेव काळे या महीलेचा चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने निघृन वार करून खून करुन तिचा पती महादेव सुरेश काळे फसार झाला होता. त्याला पकडण्याचे आव्हान शिरूर पोलिसांपुढे उभे ठाकले होते.   

या आरोपीजवळ मोबाईल नसल्याने त्याला शोधण्यास अडचण येत होती. परंतू टाकळी हाजी दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर , सहायक फौजदार नाजिम पठाण, पोलीस शिपाई विशाल पालवे यांचे पथक तपासाची सुत्रे हातात घेत तातडीने करमाळा येथे रवाना झाले.खबऱ्यांच्या मदतीने फरार आरोपीला करमाळा जि. सोलापूर येथुन मोठया शिताफीने ताब्यात घेतले आहे. 

          कुठलाही मागमुस नसतानाही फरार आरोपी गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
         ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर , पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, सहायक फौजदार नाजीम पठाण, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर, दिपक पवार, विशाल पालवे, अनिल आगलावे यांच्या पथकाने केली आहे.