धर्मपीठ,शक्तिपीठ, प्रेरणापीठ, बलिदान पीठ, राज्याची दुसरी धर्म पंढरी समजल्या जाणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळी 334 वा बलिदान दिन आज पाळण्यात आला, यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, इतिहास काळात औरंग्याने आपल्या शंभूराजांना जंजिऱ्याच्या स्वारीवर असताना, फुटीरीने कैद करून सुमारे 40 दिवस हाल करून, शंभुराजांचे जीवन संपवले होते, हे 40 दिवस वढू बुद्रुक पंचक्रोशी, तसेच संपूर्ण राज्यात, देशात बलिदान मास म्हणून पाळला जातो,
आज बलिदान दिनी समाधीला अभिषेक करून, मूकपद यात्रा शांततेत गावामध्ये काढण्यात आली, प्रेरणा मंत्राने सांगता झाली, राज्याच्या कानाकोपऱ्यातून ज्योतीचे आगमन झाले, त्यानंतर शासकीय पूजेचे आयोजन करण्यात आले होते, पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्रांत अधिकारी स्नेहल देवकाते, शिरूर तशिलदार बालाजी सोमवंशी, आमदार महेश दादा लांडगे, घोडगंगा चेअरमन ऋषीराज पवार, गटविकास अधिकारी देसाई व असंख्य शंभू भक्तांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली,
संत तुकाराम महाराजांचे वंशज कीर्तनकार ह भ प शिरीष महाराज मोरे यांचे सुस्राव्य कीर्तन झाले, त्यानंतर गृह विभागाच्या वतीने महाराष्ट्र पोलीस दलाकडून बंदुकीची सलामी देण्यात आली, यावेळी शंभू भक्तांचा जनसागर लोटला होता, वेद पठणानंतर समाधीवर शंभू भक्तांनी पुष्पवृष्टी केली, आकाशातील ढग, तुरळक पाऊस यामुळे वातावरण बिघडल्याने थोडी उशिरा हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली, त्यानंतर धर्मसभा घेण्यात आली,
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज युवा मंच, ग्रामपंचायत वढू बुद्रुक, समस्त ग्रामस्थ वढू बुद्रुक यांच्यावतीने महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती,
शासनाचे आरोग्य खाते, महसूल खाते, अग्निशामक दल याचे सर्व कर्मचारी यांनी शंभू भक्तांसाठी सुविधा दिल्या, त्याचप्रमाणे सर्व प्रसार माध्यमाचे पत्रकार देखील उपस्थित होते, तसेच बलिदान दिनी रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला यावेळी किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल रक्तपेढी यांचे वतीने रक्त संकलन करण्याचे काम करण्यात आले, शासनाच्या व पोलीस खात्याच्या चांगल्या नियोजनामुळे बलिदान दिन शांततेत पार पडला, याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले, सायंकाळी धर्मवीर शंभूराजे यांच्या जीवनावरील ऐतिहासिक नाटक प्रसारित होणार आहे,





