धर्मपीठ, शक्तीपीठ, प्रेरणापीठ, बलिदानपीठ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी आता महिला रणरागिनी सरसावल्या असून, दर महिन्याच्या 5 तारखेला महिलांची संघटना उभी करण्यासाठी समाधीस्थळावर महिला सभा घेण्यात येते, सद्यस्थितीत चाललेल्या धर्मवीर बलिदान मास मध्ये महिलांच्या वतीने दररोज सायंकाळी धर्मवीर शंभूराजे समाधी, स्वामीनिष्ठ कवी कलश समाधी हार, फुले वाहून आदरपूर्वक पूजा केली जाते, शंभू वंदना, राष्ट्र साधना, प्रेरणामंत्र, शिव वंदना घेतली जाते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जातो, यासाठी परिसरातील गावांमधील महिला प्रमुख पदाधिकाऱ्यां बरोबर सर्वसामान्य महिलांना मान दिला जात आहे, आज आठवे पुष्प, जयश्री मारुती भंडारे (वढू बुद्रुक), सुनिता महादेव भंडारे (वढु बुद्रुक), सुजाता संतोष काळे (घोडेगाव), सुनिता ज्ञानेश्वर शिवले, रोहिणी संदेश गोसावी, (आपटी), मंदाकिनी संपत साकोरे(फुलगाव), संगीता नागेश गव्हाणे (कोरेगाव भीमा), संध्या शिवाजी माळसकर(चंदननगर), मनीषा संपतराव गव्हाणे, शिल्पा गणेश फडतरे, शैला गणेश फडतरे, सविता बजरंग घावटे, कोमल नारायण ढेरंगे, रूपाली दत्तात्रय ढेरंगे, सोनाली अश्रुबा इंगळे, कविता बाळासाहेब दाभाडे

