चाळीस दिवसांचा बलिदान मास संपल्यानंतर काल मृत्युंजय अमावस्येच्या दिवशी बलिदान दिवस पाळण्यात आला, संपूर्ण राज्यातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून शंभू भक्तांनी शंभूराजांच्या समाधीसमोर आपले मान झुकवली, व अभिवादन केले,
औरंग्याने कपटाने शंभूराजांना पकडून त्यांचे चाळीस दिवस हाल हाल केले, मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी औरंग्याने शंभूराजांना मरण यातना दिल्या, परंतु या गोष्टीला भीक न घालता शंभूराजांनी हसत हसत मरण पत्करले, शंभूराजांचा शिरच्छेद झाल्यानंतरचा हा दिवस बलिदान दिन म्हणून अत्यंत दुःखांकित अंतकरणांनी पाळण्यात येतो ,
या दिवशी शंभुराजांची निघालेली अंत्ययात्रा म्हणजे मूकपदयात्रा गावामध्ये काढण्यात येते, बलिदान दिवसाचे संपूर्ण नियोजन धर्मवीर शंभूराजे स्मृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ग्रामपंचायत वढू बुद्रुक, समस्त ग्रामस्थ वढू बुद्रुक, मातृशक्ती वढू बुद्रुक, यांच्यावतीने करण्यात येते,
शंभू राजांचा धगधगता इतिहास छावा चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगापुढे आला असून शिवाजीराव सावंतांच्या छावा कादंबरीमुळे चित्रपटाला मोठा आधार मिळाला आहे, गेल्या महिन्याभरापासून समाधी स्थळी शंभू भक्तांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे,
काल बलिदान दिन झाल्यानंतर आज गुढीपाडव्याच्या दिवशी देखील लोकांची दाट गर्दी होती, आज समाधी स्थळी पारंपरिक पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली,
