सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) पासून वडू बुद्रुक गावाला जोडणाऱ्या तीन किलोमीटर आंतर असणाऱ्या रस्त्यावर अपघाताचे सत्र सतत चालू असून आज पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, संबंधित रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी अजूनही नागरिक वारंवार करत आहेत, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांचे मात्र दुर्लक्ष झाले आहे,
संबंधित रस्त्यावर इनामदार वस्ती येथे कोरेगाव भीमा येथील तरुण आपल्या दुचाकीवरून वढू बुद्रुक च्या दिशेला जात असताना अचानक कुत्रा अडवा येऊन पुढच्या चाकामध्ये फोर्क पाईप आणि चाकाच्या मधोमध अडकल्याने झालेल्या भीषण अपघातात ओमकार राजेंद्र कांबळे वय 17 वर्ष राहणार कोरेगाव भीमा तालुका शिरूर याचा जागीच मृत्यू झाला, प्राथमिक उपचारासाठी त्याला वाघोली येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु त्या अगोदर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, मृतदेह उत्तररिय तपासणीसाठी शिक्रापूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे,
ओमकार हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्याच्या जाण्याने या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून वडू बुद्रुक रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम झाल्याने वाहनांचा वेग खूपच जास्त आहे त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून आज तोवर लहान मोठे अपघातात बरेचसे जीव गेलेत, संबंधित रस्त्यावर गतिरोधक बसवावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत,
त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा चौकापासून इनामदार वस्तीपर्यंत मटन तसेच चिकनची दुकाने असल्यामुळे या ठिकाणी टाकून दिलेले मास खाण्यासाठी फिरस्त्या कुत्र्यांची टोळकी कित्येकदा दिसत आहेस, अशी कुत्री कळवंड करत अचानक रस्त्यात आल्याने बरेचसे अपघात झालेत, म्हणून अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच चिकन व मटन दुकान चालकांना सूचना द्यावी अशी मागणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतकडे नागरिक करत आहेत,
