March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
                  मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाजाविषयीची अस्मिता, प्रेम त्यांनी आपल्या कार्यामधून सिद्ध करून दाखवले आहे, आरक्षणासाठी त्यांनी आपला जीव पणाला लावला आहे, अशात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा तोल मात्र घसरला आहे, जरांगे पाटलांविषयी अपशब्द वापरून नारायण राणे यांनी आपल्या फेसबुक वर पोस्ट केली आहे, या पोस्टला नारायण राणेंची लायकीला दाखवून देणाऱ्या कमेंट पडत आहेत,

                   सद्यस्थितीत राजकारण्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय, अशी परिस्थिती आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते, मनोज जरांगे पाटील सारख्या व्यक्ती विषयी आपण शब्द वापरणाऱ्या व्यक्तीने पहिले आपले आत्मपरीक्षण करावे, अशी परिस्थिती आज समाजात तयार झाली आहे, मराठा आरक्षणासाठी जीवाच्या आकांताने पेटलेले मनोज जरांगे पाटील नावाचे वादळ, काही केल्या थांबेना, त्यामुळे आता राजकारण्यांच्या पोटामध्ये चांगलेच दुखू लागले आहे, भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नायक नारायण राणे यांचा तोल तसेच जीभ कायमच घसरत आहे,आज त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर मनोज जरांगे पाटील यांच्या विषय अपशब्द वापरून पोस्ट केल्याने जनतेच्या भावना अतिशय दुखावल्या असून त्यांच्या पोस्टला तोडीस तोड उत्तर दिले जात आहे, सर्वांनी नारायण राणे यांची फेसबुक पोस्ट पहावी,