March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
          मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस अजून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.अशा तच मोठी बातमी समोर आली आहे.

          राज्य सरकारने मराठा समाजा च्या विविध मागण्यां संदर्भात चर्चा करण्या साठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावल आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी अर्धी लढाई जिंकली आहे.मराठा समाजा च्या मागण्यां संदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यास आज मंत्रि मंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

              मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारुन तुम्ही त्याचे कायद्यात रुपांतर करा. यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने 2 दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं. आम्ही सांगितल त्याप्रमाणे सग्या-सोयऱ्यां ची व्याख्या करावी. मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार आणि उपचार अन्नपाणी काही घेणारच नाही अस मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.