सुनील भंडारे पाटील
हडपसर पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या मगरपट्टा पोलिस चौकीत एका महिलेला मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. त्याप्रकरणी हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या वाघोली पोलिस चौकीसमोरच एका तरूणाने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यामुळे लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची देखील उचलबांगडी करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या उचलबांगडीबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दुजोरा दिला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्यामध्ये नवीनच नियुक्ती झाल्यानंतर ॲक्शन मोडवर त्यांच्या कामाची झालेली सुरुवात यामुळे चांगले चांगलेचे धाबे दानाणले आहेत, नियुक्ती झाल्या झाल्या पुणे शहरातील गुंडांची परेड यामुळे आता पोलीस खात्याचा पुणे जिल्ह्यामध्ये चांगलाच वचक तयार झाला आहे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सपाट्यातून आता कोणाचीच गय केली जाणार नाही, असे एकंदरीत त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे,
