*पुणे रेल्वे स्थानकाला, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव देण्यात यावं,*
*– संभाजी ब्रिगेड पुणे*
सुनील भंडारे पाटील
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी बेचिराख झालेलं पुणे सोन्याच्या नांगराने नांगरून पुन्हा वसवले..
आदिलशाहने जिथ गाढवाचा नांगर फिरवला, तिथे राजमाता जिजाऊनी सोन्याचा नांगर फिरवला,
आज पुणेकर जे सोन्याचे दिवस बघत आहेत ते केवळ राष्ट्रमाता जिजाऊ मांसाहेबांमुळे..
पुणे शहर जिल्ह्याला जिजाऊंचा मोठा इतिहास आणि वारसा असतानाही पुणे शहरातील सरकारी वास्तूला जिजाऊंच नाव देण्यात आलेलं नाही, तरी पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव देऊन समस्त पुणेकर आणि महाराष्ट्रातील तमाम जिजाऊ, शिव, शंभू प्रेमींच्या भावनांचा आदर करावा,यासंदर्भात संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने वरिष्ठ मंडल वाणिज्य अधिकारी मा. पाठक साहेब यांना निवेदन देण्यात आले,
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, संभाजी ब्रिगेड पुणे शहर अध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, व कार्यकर्ते उपस्थित होते,
पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव देण्यात यावे ही संभाजी ब्रिगेड ची प्रामुख्याने मागणी आहे त्याचा रेल्वे प्रशासन व केंद्र सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा,
अन्यथा संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोजदादा आखरे व संभाजी ब्रिगेड चे महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे व शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिला,
