March 30, 2026
फ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक योगा दिन

फ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक योगा दिन

 

सुनील भंडारे पाटील

जागतिक योग दिवसानिमित्त फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट नर्सरी प्रायमरी सेकंडरी स्कूल कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) शाळेमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,

या कार्यक्रमात सीनियर योगा शिक्षक अजित रणसिंग यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व प्राणायाम प्रात्यक्षिके करून दाखविले यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला ,

विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व पटवून दिल्याबद्दल शिक्षक रणसिंग यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे यांच्या हस्ते झाला.

तसेच, संस्थेचे सचिव, दिलीप भोसले यांनी विद्यार्थ्यांना योगा . विषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. सदर कार्यक्रमात संस्थेचे संचालक शंकर गव्हाणे, रामदास सव्वाशे, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सैंदाने, उप मुख्याध्यापिका, अजिता नायर, सीनियर शिक्षक मारुती दरेकर, तसेच इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते शाळेतील शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या शारीरिकफिटनेस सिद्ध

केले,