March 30, 2026
टनाला 3500 रु भाव दया रयत शेतकरी संघटनेचे श्रीनाथ म्हस्कोबा सह साखर कारखान्याला निवेदन रयत आंदोलनाच्या मार्गावर  

टनाला 3500 रु भाव दया रयत शेतकरी संघटनेचे श्रीनाथ म्हस्कोबा सह साखर कारखान्याला निवेदन रयत आंदोलनाच्या मार्गावर  

सुनील भंडारे पाटील 

गाळप हंगाम 2025 ला सुरुवात झाली असून राज्यातील सर्व साखर कारखाने चालू झाले आहेत, दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर मुळी पूजनाचा कार्यक्रम जवळपास सर्व कारखान्यावर उरकला असून अद्याप शेतकऱ्यांच्या ऊसाला टनाचा भाव अजूनही जाहिर करण्यात आलेला नाही,

याबाबतीत पुणे जिल्ह्यामध्ये रयत शेतकरी संघटना आक्रमक झाली असून वास्तविकता ऊस गाळप हंगाम चालू होण्या अगोदर उसाचा भाव जाहीर करणे बंधनकारक असताना यावर कुठल्याही स्वरूपाचा निर्णय न घेता साखर कारखाने चालू करून कार्यक्षेत्रात ऊस तोडी देखील चालू झाले आहेत,

गाळप हंगाम 2025/26 चालू होऊन देखील अद्याप ऊसाला टणा प्रमाणे बाजार भाव जाहीर केला नाही, शेतकऱ्याचा ऊसाला एका टनाला साडेतीन हजार रुपये बाजार भाव जाहीर करावा अन्यथा श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी कारखान्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे, 

या संदर्भातील लेखी स्वरुपात निवेदन कारखान्याचे अध्यक्ष यांना देण्यात आले आहे, यावेळी रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष,प्रदेश उपाध्यक्ष रामदास कोतवाल, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हेमंत चौधरी, पश्चिम महाराष्ट्र सर चिटणीस अंकुश हंबीर, दौंड विधानसभा प्रवक्ते संपत हंबीर आदी उपस्थित होते,