पेरणे गावात बिबट्याचे वास्तव्य नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
सुनील भंडारे पाटील
पेरणे (तालुका हवेली) येथील धारणे वस्तीवर गेल्या महिन्यापासून बिबट्याचे वास्तव्य असून शिकारीच्या शोधामध्ये अशोक मुरलीधर ठोंबरे यांच्या घरासमोरील अंगणात रोज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान बिबट्या हजेरी लावताना दिसत आहे, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र असून अलीकडच्या काळात परिसरात बिबट्या दिसू लागला आहे, पुणे नगर महामार्ग लगत सरडे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुढे पूर्व बाजूला मोठ्या शेती क्षेत्रामध्ये अशोक ठोंबरे यांचे एकाकी घर आहे, झाडेझुडपे भरपूर असल्याने या भागात जंगल असल्यासारखी परिस्थिती जाणवते, विशेष म्हणजे ठोंबरे हे आपल्या कुटुंबा समवेत या ठिकाणी एकटेच राहतात,
आत्तापर्यंतच्या परिस्थितीत कधीच या भागात बिबट्या नव्हता परंतु गेल्या महिन्यापासून रोज सायंकाळी ठोंबरे यांच्या घरासमोर अंगणात बिबट्या आल्याने हे कुटुंब घाबरलेले आहे,ठोंबरे यांच्या घरामध्ये लहान मुले पण असल्याने सायंकाळच्या वेळी बिबट्याने शिकारीसाठी हजेरी लावल्याने जर कुटुंबातील काही व्यक्तींना धोका झाल्यास पूर्णपणे वन विभाग जबाबदार असेल असे रवींद्र ठोंबरे यांनी सांगितले,
संबंधित ठिकाणी हवेली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली, पाहणी केली परंतु बिबट्या पकडण्यासाठी काहीही ठोस असे पाऊल उचलले नाही, त्यामुळे संबंधित कुटुंबावर खूप मोठे संकट कोसळले आहे, हवेली वन विभागाने तातडीने या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे,
