March 30, 2026
वाघोली कष्टकरी कामगार वस्त्यांत मुलभूत सोई सुविधांची मनपाकडे मागणी

वाघोली कष्टकरी कामगार वस्त्यांत मुलभूत सोई सुविधांची मनपाकडे मागणी.

वाघोली प्रतिनिधी

वाघोली येथील वाघेश्वरनगर, बुरुंजवाडी, सुयोगनगर व गाडीतळ- ढोमखेलवस्त्यांना घनकचऱ्या पासून मुक्ती, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, ड्रेनेज सुधारणा, पिण्याच्या पाण्याचे समान वाटप, सफाई कामगार, स्ट्रीट लाईट आदी समस्यांबाबत मनपाच्या संबंधीत अधिका-यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

चर्चा दरम्यान उप अभियंता अशोक सांगडे, वरिष्ट आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, कनिष्ट अभियंता सचिन शिंदे यांनी संबंधितांना कामे करण्याचे आदेश दिले.

कष्टकरी कामगार वस्त्यांच्या विकासासाठी आतापर्यत शासनाने शुन्य खर्च केला आहे. सध्या मनपाने तयार केलेल्या विकास कामांसाठीच्या आर्थिक तरतुदी मधून कामगार वस्त्यांतील मुलभूत सोई सुविधा विकसीत कराव्यात.

साफ सफाई बाबत कामगार वस्याकडे होत असलेले दुर्लक्ष खपुन घेतले जाणारनाही, सफाई कामगारांच्या नेमनुका करताना गरजु महिलांना संधी द्यावी आदी विषयांवर अँड. बी.एम. रेगे यांनी अधिकाऱ्यांना समजावले.. अंगमेहनती कष्टकरी व अदिवासी यांचे प्रलंबित प्रश्नांवर

जमीन हक्क परिषद तिर्व आंदोनलनाची तयारी करत असून पुढील नऊ दिवस संबंधित अधिकारी यांना शेवटचे स्मरण देण्यात कार्यक्रम आखला असून आज पहिला दिवस असल्याची माहिती अँड. पल्लवी रेगे यांनी दिली.

शिष्टमंडळात दगडखाण परिषदेचे संदिप मोरे, मऱ्याप्पा चौगुले, गणीभाई सैय्यद, संजय शिवशरण, शिवाजी पात्रे, अनिल हतागळे, मोहम्मद रोगनगर, शुभाष जाधव, रामलिंग कांबळे, रामकुमार पुजारी, साहेबराव घुले, मनोहर पांचाळ, पांडुरंग भालेराव, अदिनाथ चांदणे सहभाग घेतला.