लोणीकंद–पेरणे गटातील लहान मुलांसाठी कात्रज सर्पोद्यान पाहण्यासाठी सहल
सुनील भंडारे पाटील
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील बुर्केगाव येथून माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या पुढाकाराने लहान मुलांसाठी कात्रज सर्पोद्यान येथे विशेष सहल आयोजित करण्यात आली.
या सहलीत ७० हून अधिक मुलांनी सहभाग घेत निसर्ग आणि प्राणीविश्वाची प्रत्यक्ष ओळख करून घेतली.
सहल माजी उपसरपंच दादासाहेब ठोंबरे, माजी चेअरमन बाळासाहेब ठोंबरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झाली. सहलीच्या नियोजनात भाऊसाहेब ठोंबरे, किरण सोनवणे, भिमा ठोंबरे, सागर झुरुंगे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.
मतदारांवर लक्ष केंद्रित न करता मुलांसाठी घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील काळात आणखी ८ ते १० सहलींचे नियोजन असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सहलीची सुरुवात बुर्गेगाव, पेरने गाव येथून झाली, त्यानंतर मुलांना आळंदी फाटा येथे नाश्त्याची व्यवस्था केली होती, नंतर मुलांना पुणे कात्रज येथील सर्पोद्यान येथील विषारी व अति विषारी बिनविषारी सापांच्या सर्व जाती यांची माहिती देण्यात आली,
त्यानंतर लहान मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली, सर्व नियोजन व्यवस्थित रित्या पार पडल्याने, मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता, तसेच लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये हा नवीन उपक्रम राबवल्यामुळे योगेश झुरुंगे मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे,
