प्रदीप दादा कंद यांच्या प्रयत्नातून पिंपरी सांडस भीमनगर येथे जिम लोकार्पण सोहळा पै किरण साकोरे यांची माहिती
सुनील भंडारे पाटील
भिमनगर, पिंपरी सांडस (तालुका हवेली) येथे ओपन जिम लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला, लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ नेते , सर्वांचे मार्गदर्शक प्रदिपदादा कंद यांच्या विशेष प्रयत्नातून 20% जिल्हा परिषद समाज कल्याण निधीतून तयार झालेल्या ओपन जिम चे लोकार्पण करण्यात आल्याचे पैलवान किरण साकोरे यांनी सांगितले,
पिंपरी सांडस येथील भीम नगर या वस्तीमध्ये तरुण युवक यांच्या मागणीनुसार तातडीने निर्णय घेण्यात आला, सद्यस्थितीमध्ये युवकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असताना सुदृढ तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी जीवनामध्ये व्यायाम महत्त्वाचा असल्याचे प्रदीप दादा कंद तसेच पैलवान किरण साकोरे यांच्या लक्षात आले, किरण साकोरे यांनी जीवनामध्ये पैलवानकीचा ध्यास उराशी बाळगत आरोग्याचे महत्व नेहमी तरुण युवकांना पटवून दिले,
व्यायामाचे महत्व तसेच ज्ञान त्यांनी समाजासमोर जागृत करत कायम विकासाच्या बाबत मागे असणाऱ्या भीमनगर वस्तीमध्ये व्यायाम शाळा तयार करून समाजासमोर एक आदर्श तयार केला आहे,
या व्यायाम शाळेच्या लोकार्पण प्रसंगी सरपंच साधना सोमनाथ भोरडे, उपसरपंच मंगल भगवान भोरडे, मा उपसरपंच गोरक्षनाथ भागोजी भोरडे, मा उपसरपंच मंगेश संभाजी गवारे, ग्रामपंचायत सदस्य संदीप किसन कंचे, मा. उपसरपंच अशोक बबन भोरडे, सदस्या उज्वला भानुदास निकाळजे, मा उपसरपंच प्रवीण रामदास काळे, सदस्या मनिषा संतोष वायकर, सदस्या सपना सतीश भोरडे, सदस्या मनिषा भाऊसाहेब कसुरे, सदस्या रोहिणी संजय मांडे, मा. उपसरपंच अनिल काळे, ग्रा वि अधिकारी जी एच वालकोळी तसेच ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.
