शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्लासर
तळेगाव ढमढेरे येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ८८.५७ टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.
विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे : वाणिज्य शाखा : प्रथम – सलोनी शामराव चौधरी (८०.६७ टक्के), व्दितीय – प्रगती नवनाथ तौर (७८.८३ टक्के), तृतीय – निकिता बाबासाहेब रासकर (७७.१७ टक्के). कला शाखा :- प्रथम – प्रतीक्षा परशुराम पारखे (६३.८३ टक्के), द्वितीय – वैष्णवी दत्तात्रय भोसुरे (६० टक्के), तृतीय – आशुतोष अनिल मेटे (५८.६७ टक्के). सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांनी अभिनंदन केले व पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.


