March 30, 2026

 शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला

 
         तळेगाव ढमढेरे येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च
माध्यमिक विद्यालयात जागतिक ऑलीम्पिक दिनाचे औचित्य साधून सायकल रॅली व
चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक
बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.     

तळेगाव ढमढेरे येथील भुजबळ विद्यालयात जागतिक ऑलीम्पिक दिनानिमित्त आयोजीत सायकल रॅली.(छाया : नमीरा डिजीटल)

  आजच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराचे प्रमाण जास्त होऊन
व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे या हेतूने विद्यार्थ्यांमध्ये सायकल
चालवण्याची आवड निर्माण व्हावी तसेच सायकल चालवा इंधन वाचवा व तंदुरुस्त
राहा असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. सायकल रॅलीमध्ये
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यालयामध्ये
चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध क्रीडा
क्षेत्रातील खेळाडू, मैदानावरील खेळाचे प्रात्यक्षिक, खेळाचे साहित्य,
याविषयीची चित्रे विद्यार्थ्यांनी काढली.  चित्रकला स्पर्धेचा निकाल
पुढीलप्रमाणे :- छोटा गट : प्रथम –  प्रतिक्षा बुधा पाटील (सहावी अ ),
द्वितिय – सोहम विकास भुजबळ (सातवी ब ), तृतीय – पूर्वा संदीप भुजबळ (सातवी
अ), उत्तेजनार्थ दिनेश संपत भुजबळ (सातवी अ). मोठा गट : प्रथम – मयुरी
संजय राठोड (आठवी अ), द्वितीय – सिद्धिका संजय माने (आठवी अ), तृतीय – सोनम
दिपक अडागळे (नववी), उत्तेजनार्थ – प्रीतिका भाऊसाहेब शेलार (आठवी अ) या
उपक्रमाचे आयोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक किरण झुरंगे व गणेश मुंजावडे
यांनी केले.