सुनील भंडारे पाटील
पेरणे फाटा तालुका हवेली येथील तापकीर वस्ती ( वडू खुर्द ) मधील
हनुमान मंदिरामधील सुमारे पाच किलो वजनाची पितळी घंटा अज्ञात चोरट्यांनी
भरदिवसा चोरून नेली,
काही दिवसापूर्वी
श्री हनुमान दर्शनासाठी अनोळखी लोकांनी मंदिरात प्रवेश केला होता, ही बाब
लोकांच्या लक्षात आली होती, परंतु लोकांना मंदिरात चोरी होईल असे वाटले
नाही, दर्शनासाठी दिवसभर मंदिर उघडे असते,
आसपास, मोजकीच लोक असतात, गर्दी नसल्याने याचाच फायदा घेत चोरट्यांनी
दिवसाढवळ्या चोरी करून पोबारा केला,
ही घंटा अंदाजे 10,000 /- किमतीची
असून, चोरट्या पासून मंदिरे देखील सुरक्षित नाही ही बाब पुन्हा एकदा ऐरणीवर
आली आहे, चोरट्यांनी दुपारीच डल्ला मारल्याचे संध्याकाळी उशिरा लोकांना
समजले, त्यानंतर लोकांची गडबड झाली, अशी माहिती श्री हनुमान मंदिर
ट्रस्टचे राजू तापकीर यांनी दिली,



