March 30, 2026

सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले

 
           संत निळोबाराय दिंडी सोहळ्यातील चिंचोली मोराची या दिंडीतील
२५० वारकर्यांस उद्योजक एकनाथ नाणेकर यांनी रेनकोटचे वाटप केले . पावसाळा
सुरु झाल्यामुळे वारकरी पावसाने भिजून आजारी पडू नये म्हणून सरपंच अशोक
गोरडे, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष रामभाऊ धुमाळ उपाध्यक्ष बाळासो कारंडे , हभप चंद्रकांत नाणेकर , शहाजी विरोळे या मान्यवरांचे हस्ते वारकरी म्हणून चालणाऱ्या २५० भाविकांना रेनकोट वाटप करणेत आले    

              फोटो : वारकरी भावीकांना २५० रेनकोटांचे वाटप करताना हभप चंद्रकांत नाणेकर , सरपंच इं ,

चिंचोली मोराची या दिंडीची शिस्त व नियोजना बदल ख्याती असलेने ६
वर्षात ५०ची २५० वर वारकरी संख्या पोचून राज्यात ९ व्या नंबरवर पोचली .
मानाच्या ६फूटी खिलारी बैल जोडीने सर्वांचे लक्ष वेधले . बैलाच्या
देखभालीसाठी साहेबराव नाणेकर, सुभान नाणेकर , रसीक फंड, हभप संतोष फौजीसह
६-७ माणसे राबतात . सरपंच अशोक गोरडे हे निवृत एसीपी असून ते सपत्नीक दिंडी
बरोबर पायी चालत आहेत हे विशेष !