सुनील भंडारे पाटील
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित कलासासारखीच सुविधा मिळत असल्याने ५ वी ते १२ च्या क्लास साठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठी गर्दी केली होती. उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंद. प्रत्येक विषयासंबंधी तज्ञ शिक्षकांचे वैयक्तिक पूर्णवेळ मार्गदर्शन, विषयानुरूप अद्ययावत नोट्स,प्रश्नसंच व टेस्ट , प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र कौंसलिंग, स्पर्धा परीक्षा ,नीट या परीक्षांची ८ वी पासून सर्वांगीण तयारी करून घेणार असल्याने सणसवाडी सारख्या गावात शहरातील नामांकित क्लासच्या सुविधा मिळत असल्याने पालक व विद्यार्थी आनंदात असून मोठ्या प्रमाणात प्रवेशासाठी गर्दी करताना दिसत आहेत .
विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी क्लास सुरू करण्यात आल्याचे क्लासचे संस्थापक अमोल दरेकर यांनी सांगितले.


