गेल्या अनेक वर्षापासून संबंधित काम प्रलंबित असल्याकारणाने येणाऱ्या अडचणी दूर करत शेतकरी व ग्रामस्थ यांचा समन्वय साधक अखेर या रस्त्याचे काम चालू झाले अशी माहिती कोरेगाव भीमाचे सरपंच अमोलजी गव्हाणे यांनी दिली,
संबंधित रस्त्यावरून प्रवास करताना पावसाळ्यात ग्रामस्थांना खूप अडचण व्हायची, ग्रामस्थांची अडचण पाहून सरपंच गव्हाणे यांनी प्रयत्न करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी टाकला, आता हे काम पूर्णत्वास जाणार त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला, रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य जयश्री गव्हाणे, बबनराव गव्हाणे, दीपक गव्हाणे, प्रवीण गव्हाणे, दशरथ गव्हाणे, माजी उपसरपंच निलेश गव्हाणे, अविनाश देवकर, किरण गव्हाणे, अमोल श्रीधर गव्हाणे, सुरेश गव्हाणे, संदीप नारायण गव्हाणे, भाऊसाहेब गाडेकर, साहेबराव गव्हाणे, अजय गव्हाणे, सागर कैलास गव्हाणे व ग्रामस्थांनी प्रयत्न केले,


