March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
         गुनाट (ता. शिरूर) : आपण समाजाच नेहमी काहीतरी देणं लागतो या सामाजिक भावनेतून गुनाट येथील सरपंच संदेश ज्ञानदेव करपे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून एका अनोख्या पद्धतीने उपक्रम राबवला आहे त्यांनी गुनाट  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्री दत्त माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत परिसर, श्री दत्त मंदिर परिसर, दशक्रिया विधी घाट, स्मशानभूमी व इतर परिसरात १००१ झाडाचे वृक्षारोपण केले आहे  त्यामध्ये नारळ, आंबा, जांभूळ, पिंपळ, अशोका, इत्यादी झाडांचा समावेश होता.             

दोन वर्षानंतर शाळा गजबजल्या पण अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणे अवघड जाईल हा मुद्दा लक्षात घेऊन  संदेश करपे यांनी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील इयत्ता पहिलीतील २५ विद्यार्थ्यांना पुस्तक सेट आणि शाळेतील प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक वृक्ष असे वाटप करण्यात आले.       

सध्या सर्वत्र धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करण्यात येत आहे. यासाठी मोठा खर्च करण्यात येतो अतिरिक्त डीजे ,सजावट, फुगे फोडणे, मेणबत्त्या जाळणे,फटाके वाजवणे असा खर्च सध्या वाढदिवसाला करण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. मात्र सामाजिक आत्मभान कायम ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा बंद झाली आहे. क्वचितच असा उपक्रम पाहायला मिळत आहे. पण गुनाट येथील युवा सरपंच संदेश करपे हे गेले अनेक वर्ष वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून ते विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करतात. त्यांनी आज सर्व मित्र परिवारांसोबत हा उपक्रम साजरा केला.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील,मा.कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर सभापती शशिकांत दसगुडे, कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर उपसभापती सतीश कोळपे सर, मा. सरपंच गणेश कोळपे, तंटामुक्ती अध्यक्ष बापू झिटे, गणेश करपे, निमोणे सरपंच येथील संजयआबा काळे, डॉक्टर संतोष जाधव, उपसरपंच पांडुरंग गव्हाणे, ग्रा. सदस्य रामदास काकडे, ग्रा. सदस्य गोरक्ष धुमाळ, पोलीस पाटील हनुमंत सोनवणे, सचिन करपे, शिरूर तालुका शेतकरी संघटना बाळासाहेब घाडगे, संतोष भोस्, राजेंद्र करपे, राजाराम वळू, अनिल भालेराव, संभाजी गाडे, मारुती वाघमारे, रंगनाथ भोरडे, तसेच गुनाट ग्रामस्थ, संस्कार युवा मंच आदी. विकास सेवा सोसायटी , ग्रा. सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान उपसभापती कृषी उ. बाजार समिती शिरूर सतीश कोळपे सर,मा. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे , जिल्हा प.सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाचर्णे सर आणि श्री दत्त माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक धुमाळ सर यांनी सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने सरपंच संदेश करपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले.